
शोधतोस तू काठावरी, दिसती तुला मुलामुली
हसताना तिला आठव, आठवती ती गंमत जुनी
रडशील तू, ती नाही तिथे, बघशील तू त्या काठावरी
नव्हता अर्थ त्या पाहण्यात, आता तिथे काही नाही.
भिंतीत कोंडतोस स्वतःला, भेटीची वाट तू पाही
करशील खाणं कसंबसं, गरजेची नाही पंगती
वाटेल तुला एका क्षणी, तर्क नाही त्या प्रीती
रडशील पुन्हा त्या सुरात, दिसेल बाजू ती एकटी.
वळशील एकदा त्या दिशेने, आता तिथे काही नाही.
–written by मी

Show your support
Write a comment ...